मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडेतोड उत्तर दिलं. राणे कुटुंबीयांना बेडूक म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राणेंनी गांडुळाची उपमा दिली. राणे कुटुंबीयांच्या वाटेला जाल तर ३९ वर्षांत पाहिलेला, अनुभवलेला सगळा इतिहास बाहेर काढेन,’ असा इशारा यावेळी राणेंनी दिला. दसरा मेळाव्याच्या भाषणात राणे पिता-पुत्रांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी […]
टॅग: CM Uddhav Thackeray
सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना कळणारही नाही – रामदास आठवले
मुंबई : सरकार पडलं तर अराजकता पसरेल असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केले होते. या मताशी मी सहमत नसल्याचे आठवले म्हणाले. आठवले म्हटले कि, सरकार आम्ही पाडणार नाही पण हे सरकार कधी पडणार हे उद्धव ठाकरे यांना कळणारही नाही, हे सरकार स्वतः पडणार, सरकार खुद गीर जायेगे, महाविकास आघाडी हार जायेगी अशा […]
करोनारुपी रावणाचा नाश करुया, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा
मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी शब्द फिरवला, शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे- देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपये राज्य सरकारने जाहीर केले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले कि, बळीराजाला अतिशय तोकडी […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज मराठवाडा दौरा; मदत जाहीर करणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष
उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. […]
मी अमित शहांना ओळखतो, ते सत्य भूमिका मांडतात- संजय राऊत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. ते सत्य भूमिका मांडतात, असे म्हटलं आहे. महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्या […]






