uddhav thackeray dussehra wishes
महाराष्ट्र मुंबई राजकारण

करोनारुपी रावणाचा नाश करुया, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई : विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करुन विजय खेचून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेऊ. आपण एकजुटीने करोनारुपी रावणाचा नाश करुया. करोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल असाही विश्वास दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसंच महाराष्ट्राच्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले कि, लढवय्या महाराष्ट्र ही आपल्या राज्याची ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वीपणे सामना केला आहे. करोनाच्या संकटात निसर्गाचीही अवकृपा झाली. पण या सगळ्या संकटांना न डगमगता आपण सामोरे जात आहोत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्यांनी खूपच संयम दाखवला आहे. घराघरापर्यंत पोहचून करोना विषाणूचा पाठलाग करुन त्याला रोखण्यासाठी करोना योद्धे काम करत आहेत. करोना विषाणूला पराजित करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवत आहोत. सर्व धर्मीयांनी आपले सण आणि उत्सव घरीच साजरे केले. विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण आपण साजरा करणार आहोत. दसरा हा सण संकटांवर, वाईट प्रवृत्तींवर मात करण्यासाठी सीम्मोलंघन करुन विजय खेचून आणण्याची प्रेरणा देतो. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपण दसरा उत्साहात साजरा करत असतानाच करोना विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत