ठाणे : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केमिकल वाहतुकीसाठी रत्नागिरीकडे निघालेल्या टँकर मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडला पलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात […]

