Rhea confessed to buying drugs
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही

मुंबई :  रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडणार..?

सुशांतच्या घरात काम करणारा दिपेश सावंत सीबीआयसाठी माफीचा साक्षीदार होणार आहे. दिपेशने सुशांत आणि रिया यांच्यात ८ जून रोजी वाद झाल्याची माहिती सीबीआयला दिली.सीबीआयने दिपेशला मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. तिथून बाहेर पडण्यास त्याला सक्त मनाई आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाला […]

sushant deathcase cbi inquiry
मनोरंजन मुंबई

सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआयने मागितली एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत

सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे. एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन महाराष्ट्र

सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआय करणार मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती हिच्या सतत संपर्कात होते, या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तपासात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात […]

मुंबई

सीबीआयमार्फत दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचं होणार नाही अशी आशा-शरद पवार

सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. महाराष्ट्र सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. दरम्यान, शरद पवारांनी याविषयी ट्वीट करुन म्हटलं आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा […]

मनोरंजन महाराष्ट्र

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीआपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ एवढंच पण सूचक ट्वीट केलं आहे. दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करणार- सुप्रीम कोर्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून सीबीआय तपासाबाबत काय निकाल येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका […]

महाराष्ट्र राजकारण

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाविषयी शरद पवार यांची प्रतिक्रिया

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की एका अभिनेत्याने आत्महत्या करणं दुर्दैवी आहे. पण मीडियात ज्या पद्धतीने चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतं. माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण मीडियाने त्याची नोंदही घेतली नाही. महाराष्ट्र तसंच मुंबई पोलीस […]

justice for sushant singh rajput
मनोरंजन

अखेर सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. अखेर केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या CBI चौकशीस मान्यता दिली आहे. सुशांत मृत्यू […]

sushant deathcase cbi inquiry
मनोरंजन

सुशांतच्या मृत्यूच्या CBI चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अलका प्रिया नावाच्या तरुणीने याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितलं, “पोलिसांना त्यांचं काम करु द्या. व्यक्ती चांगली होती की वाईट याचा याच्याशी काही संबंध नाही. जर तुमच्याकडे काही ठोस आहे तर मुंबई उच्च न्यायालयात जा,” असं सरन्यायाधीशांनी […]