MP Navneet Rana and MLA Ravi Rana in police custody
महाराष्ट्र

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राणा दाम्पत्यांनी उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नवनीत राणा व रवी राणा रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच त्यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला.