पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांनी विद्यमान मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर आता एनडीएने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप, जनता […]

