उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक कार सुमारे सातशे मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये 10 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. एसयूव्ही उत्तराखंडमधील जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. या कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेले होते. […]
टॅग: 3 injured
नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा भीषण स्फोट, 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 3 जखमी
आंध्रप्रदेश : आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरातील एका 40 वर्षीय व्यक्तीच्या नवीन इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन त्याच्या बेडरूममध्ये आग लागून त्याचा मृत्यू झाला. बाईकची बॅटरी बेडरूममध्ये चार्जिंगसाठी ठेवली असता तिचा स्फोट झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, के. शिव कुमार या 40 वर्षीय व्यक्तीने त्याच्या बेडरूममध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी चार्जिंगसाठी ठेवली होती, यावेळी […]


