उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी महाकुंभ मेळ्याच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. झुंसी येथील छतनाग घाटातील नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आग लागल्याची माहिती आहे. या आगीत सुमारे १५ तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. […]

