Car Crashes Into Ravine In Uttarakhand, 12 Passengers died,3 injured
देश

उत्तराखंडमध्ये कार खोल दरीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू, ओव्हरलोडमुळे घडला भयंकर अपघात

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक कार सुमारे सातशे मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये 10 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. एसयूव्ही उत्तराखंडमधील जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. या कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसलेले होते. […]