Parthiv Patel announces his retirement from all cricket
क्रीडा

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने केली निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने १७ व्या वर्षी भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते, तेव्हा तो सर्वात कमी वयाचा विकेटकिपर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पार्थिव गुजरातकडून खेळत होता. भारतीय संघात खेळण्याचे पार्थिवने अनेकदा प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही. नंतर तो आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. […]