Sonali Sood, Wife of Actor Sonu Sood, Injured in Road Accident on Samruddhi Highway
मनोरंजन

अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा समृद्धी महामार्गावर अपघात

मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात […]

Nagpur Violence Case Update Treason Case Filed On Fahim Khan And 50 Others, Police block Social Media posts
नागपूर महाराष्ट्र

नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे…

नागपूर : नागपूर दंगलीच्या प्रकरणात मुख्य आरोपी फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणात ५० हून अधिक आरोपींवर कडक कारवाई करत गंभीर कलमं लावली आहेत. नागपूर दंगल प्रकरणी पोलीस तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या. नागपूरमधील वातावरण बिघडवण्यासाठी काही दिवसांपासून प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, काही […]

Give immediate priority to the work of the common peoples, Guardian Minister Chandrashekhar Bawankule instructs officials
महाराष्ट्र मुंबई

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन

नागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुक्यात व इतर ठिकाणी दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. इतर तालुक्यात जे लहानमोठे नदी, नाले, ओहोळ आहेत ते पावसाने काठोकाठ वाहिल्यामुळे पुराचा प्रश्न उद्भवून मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. पाणीटंचाई आणि अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा सामना करण्याची वेळ येऊ नये यादृष्टीने जलसंधारणाची कामे करणे आवश्यक असून जिल्ह्यातील किमान […]

Murder of Garage Owner in Nagpur Due to Footpath Dispute
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपुरात दिवसाढवळ्या हत्येची घटना, फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भयंकर कृत्य

नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. […]

Nagpur will be developed as the best city in the country – Deputy Chief Minister Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

नागपूर देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : नागपूर शहरातील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे करण्यात येऊन हे शहर खड्डेमुक्त व देशातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसीत करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जयताळा येथे नागपूर महानगरपालिका, नासुप्र आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या विविध विकासकामांचे डिजिटल लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय […]

Winter Session of Legislature at Nagpur from December 19
महाराष्ट्र

नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

मुंबई : विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज […]

Nagpur ready for Prime Minister Narendra Modi's event
नागपूर महाराष्ट्र

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी नागपूर सज्ज

नागपूर : महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी […]

Successful kidney transplant by experts at Amravati Hospital without the help of Nagpur's medical team
अमरावती महाराष्ट्र

नागपूरच्या वैद्यकीय टीमची मदत न घेता अमरावतीच्या रुग्णालयात तज्ज्ञांकडून किडनी प्रत्यारोपण यशस्वी

अमरावती : अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांनी किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णालयाचे हे पंधरावे प्रत्यारोपण होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील श्रीमती किरण अशोक नंदागवळी या मातेने आपल्या मुलाला किडनी दान करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील, वडिलांचे छत्र नसलेला सोमेश्वर अशोक नंदागवळी हा 24 […]

Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. चालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक […]

Welcome to Deputy Chief Minister Devendra Fadnavis in Nagpur
नागपूर महाराष्ट्र राजकारण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]