मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला, यावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले. अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस […]

