Liquor Ban in Panoḍi Village
अहिल्यानगर महाराष्ट्र

पानोड़ी ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, महिलांच्या संघर्षानंतर दारूबंदीचा ठराव मंजूर

पानोड़ी (ता. संगमनेर) : पानोड़ी गावातील महिलांनी दारूच्या दुष्परिणामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे गावातील मद्यविक्रीवर बंदी येणार आहे, आणि दारूच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून गावात अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती, ज्यामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत होते. घरातील पुरुष मद्याच्या आहारी […]

The work in Search's Shodhagram project is also a guide for the administration
महाराष्ट्र

‘सर्च’च्या शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी, राज्यपालांकडून कार्यकर्त्यांचे कौतुक

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल कोश्यारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून […]