मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक खूप वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट […]
टॅग: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापन यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण […]
अंबाजोगाईतील अवैध धंद्याबाबत जबाबदार पोलीस निरीक्षकाला निलंबित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जबाबदार धरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अंबाजोगाई […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट
वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रमातील […]
केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा, एकमेकांमध्ये उत्तम समन्वय ठेवणे आवश्यक
मुंबई : नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनीदेखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचावे, आपली कार्यक्षमता वाढवताना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व योजनांच्या लाभार्थींना वैयक्तिकरित्या मुख्यमंत्र्यांचे […]
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत
नागपूर : राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर […]
माझा बदला म्हणजे मी ‘त्यांना’ माफ केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. शिंदे सरकारच्या बाजूने एकूण 164 मते पडली तर विरोधात केवळ 99 मते पडली. दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र विधान भवनात झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण केले. फडणवीस यांनी भाषणात विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी परत येईन असे एकदा […]






