Devendra Fadnavis
महाराष्ट्र मुंबई

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार – उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यांनी सांगितले की, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक खूप वाढली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली जाईल. या सिस्टीम मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या ट्रॉलरची माहिती तत्काळ मिळेल. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येईल. या यंत्रणेत जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला जाईल. अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गावर झालेल्या अपघातामुळे झालेल्या आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मदत मिळण्यात काही उणिवा राहिल्या का हे तपासण्यासाठीही अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबतच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत