मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. […]

