शिर्डी : केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांमध्ये “नक्शा” प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. महाराष्ट्रातील १० नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश आहे. त्यापैकी एक असलेल्या शिर्डी नगरपरिषद क्षेत्रात आजपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहराच्या हद्दीतील संपूर्ण भूभागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे “नक्शा” […]
टॅग: शिर्डी
शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी
शिर्डी : विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराऊंड शिर्डी […]
चिंताजनक! शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिस
अहमदनगर : शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट (PMT) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने चिंतेत भर पडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत राहते. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली असून धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. […]
श्री साईबाबा विश्वस्त संस्थानने सुरु केला ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प
अहमदनगर : श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी इतरांवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. […]
तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास… शिवसेना महिला आघाडी आक्रमक
भक्तांच्या कपड्यासंदर्भात साई संस्थान आणि तृप्ती देसाई यांच्या वादात आता शिवसेनेनं उडी घेतली आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला केला होता. यावर आता शिवसेनेकडून तृप्ती देसाईंना इशारा देण्यात आला आहे. आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास […]
सुजय विखे यांच्या हस्ते ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन, साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळणार
भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते ऑनलाइन साई ब्लेसिंग बॉक्सचे उद्घाटन करण्यात आलं. भाविकांना तसंच आपल्या आप्तेष्टांना साईबाबांचे आशिर्वाद घरबसल्या मिळावे यासाठी शिर्डीत साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवण्यात आली आहे. देश-विदेशात साईबाबांचे लाखो भक्त आहेत. साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. पण कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या संकल्पनेतून शिर्डीचे […]