नागपूर : नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेराव घातला. राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक […]

