मुंबई : जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी परिसरात आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सिमेंटचा ब्लॉक खाली पडल्याने संस्कृती अनिल अमिन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची वेळ सकाळी सुमारे ९.३० ची असून, संस्कृती कामासाठी जात असताना उंच इमारतीवरून पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने तिच्या डोक्यावर जबर मार बसला. स्थानिकांनी […]
टॅग: मृत्यू
काळू धबधब्याजवळ दरड कोसळली, पुण्यातील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुणे : रविवारी सकाळी माळशेज घाटाजवळील काळू धबधब्याजवळ दरड कोसळून पुण्यातील २३ वर्षीय हिमालकुमार बिनोदकुमार सिंग (खराडी) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्याचा साथीदार अंशुमन मौर्य (२३) जखमी झाला. दोघेही पुण्यातील ट्रेकिंग गटाचा भाग म्हणून धबधब्याला भेट देण्यासाठी गेले होते. सकाळी ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर हा गट काळू धबधब्यावर पोहोचला, जो पाच टप्प्यात कोसळतो आणि […]
भीषण अपघात! लातूर-सोलापूर महामार्गावर दोन ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक, 2 ठार, 20 जखमी
लातूर : लातूर-सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या वाहनाचा अपघात याच मार्गावर झाला होता. आज पहाटे पुन्हा एकदा या मार्गावर भीषण अपघात झाला असून, दोन ट्रॅव्हल्समध्ये पाठीमागून झालेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा […]
भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली, दोन जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी
रायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी प्रवासी बसचा रविवारी रात्री उशिरा रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला. या अपघातात सध्या मिळालेल्या माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींवर पनवेल आणि कळंबोली येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. […]
पुणे : अल्पवयीन मुलाकडून रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात, १९ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज (दि. २ एप्रिल) पहाटे तिहेरी अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे स्थानिक आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सकाळी पाच वाजेच्या सुमारास खामगाव ते शेगाव रोडवर जयपुर लांडे फाट्याजवळ हा भीषण […]
हिंजवडी आयटी पार्कमध्ये मिनी बसला भीषण आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू, १० जखमी
पुणे : पुण्यात बुधवारी सकाळी हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला. यात दहा प्रवासी भाजले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. आयटी पार्कच्या फेज १ मधील हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाजवळ सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गाडीला आग लागली. सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास […]
पुणे : जेजुरीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीजवळील दौंडजवळ एका भयंकर मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती मोटारसायकलवरून रस्त्याच्या चुकीच्या बाजूस जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या […]
लग्नाला चालेल्या वऱ्हाडाची बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
डेहराडून : उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही […]
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत 6,852 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू, अहवालातील आकडेवारी चिंताजनक…
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एकूण ६,८५२ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यापैकी ६०१ मुले अल्पवयीन मातांच्या पोटी जन्माला आली होती, असे राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. 14 मार्च 2022 रोजीच्या आदेशाचे पालन करून राज्याने सादर केलेल्या अहवालाचा हा भाग होता, ज्याद्वारे उच्च न्यायालयाने संपूर्ण […]










