नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या […]
टॅग: महाराष्ट्र
भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाची, बलिदानाची, शौर्याची परंपरा आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हा, पोलीस दलाची शान वाढवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री […]
चिंता वाढली! राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 8067 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासांत ८,०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही ४५४ झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. आज राज्यात कोरोना […]
राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीवर
मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार […]
महाराष्ट्रात गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी सुरु, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री […]
राज्यात, देशात कुठेही काम करतांना भ्रष्टाचार दूर करण्याचे आव्हान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत महाराष्ट्राचे असतील किंवा अन्य कुठल्याही राज्यातले, पण या सर्वांनी देशाला आपला परिवार मानून प्रशासनात करिअर करायचे ठरविले आहे. आपली कुठेही नियुक्ती होवो पण भ्रष्टाचाराचा काळोख दूर करण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वर्षा […]
देशाचे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहण्यासाठी आवश्यक सुविधा देणार – अजित पवार
पुणे : देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील, त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य […]
राज्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार गडगडाटासह पाऊस
मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या […]
महाराष्ट्राच्या नावावर नवा विक्रम, दिवसभरात सुमारे अकरा लाख नागरिकांचे झाले लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत […]
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना होणार फायदा
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून जे शेतकरी पिकांसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मुंबईत […]










