BSF jawan killed in gunbattle with militants near Bangladesh border in Tripura
देश

त्रिपुरामध्ये बांग्लादेश सीमेजवळ झालेल्या चकमकीत बीएसएफ जवान शहीद

त्रिपुरा : शुक्रवारी उत्तर त्रिपुराच्या कांचनपूर उपविभागातील भारत-बांग्लादेश सीमेवर संशयित NLFT अतिरेक्यांसोबत झालेल्या भीषण चकमकीत एक बीएसएफ जवान शहीद झाला. बीएसएफच्या 145 बटालियनचा ग्रिजेश कुमार असे या जवानाचे नाव असून, गोळीबारात त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. कांचनपूर उपविभागातील सिमा-2 सीमा चौकी परिसरात बीएसएफचे एक पथक क्षेत्र वर्चस्व अभियानावर होते, यावेळी अतिरेक्यांच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. […]