मुंबई : फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना आज दादरच्या गजबजलेल्या परिसरात घडली. छबीलाल जैस्वार (५५) असे मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. दादर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच आरोपी बसवराज मेलिणामनी (३०) याला अटक केली आहे. टॅक्सीचालकाने जवळचे भाडे नाकारले, त्यामुळे संतापलेल्या फळविक्रेत्याने रागाच्या भरात हे भयानक कृत्य केले. या घटनेने […]

