परभणी : राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने […]
टॅग: परभणी
नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]
भरदिवसा घरात घुसून महिला डॉक्टरवर चाकूने हल्ला, परभणीतील धक्कादायक प्रकार
परभणी : परभणीत दोन जणांनी भरदिवसा घरात घुसून एका महिला डॉक्टरवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील गणेश नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. […]
येत्या 3-4 तासांत ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता
मुंबई : येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा येथील घाट परिसर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे […]
राज्यात थंडीची लाट, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या चांगलीच थंडी जाणवत आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून याबाबत इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र […]
‘या’ जिल्ह्यांत पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात हाय अलर्ट
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, नाशिक, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आज पुन्हा हाय अलर्ट असू शकतो. Intense spells of rain […]
राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3-4 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक […]
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच, राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी […]
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, […]
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट
मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]