Maharashtra Government to Enforce Gutkha Ban with MCOCA in 2026 – Legal Amendments Ahead
महाराष्ट्र मुंबई

गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई : राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व […]

नागपूर महाराष्ट्र

म्हाडा प्राधिकरणाच्या रिक्त पदे आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर : म्हाडा प्राधिकरणाकडून कार्यकारी अभियंता पदोन्नतीच्या खात्यांतर्गत सेवाज्येष्ठता समितीसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर राज्य शासन सहा आठवड्यांच्या आत पदोन्नतीबाबत निर्णय घेईल. न्यायालयाने दिलेल्या कालमर्यादेपेक्षा आधीच, म्हणजे एका महिन्यात डीपीसी पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य अमीन पटेल आणि योगेश […]

Fast-Track Justice in Crimes Against Minor Girls, Says Deputy CM Eknath Shinde
नागपूर महाराष्ट्र

लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्याय; आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर : राज्यात लहान मुलींवरील बलात्कार व खुनासारख्या अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषींना तत्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना विधानसभा सदस्य सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी […]

नागपूर महाराष्ट्र

मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : जुन्या लोकांना तातडीने घरे देणे तसेच नवीन प्रकल्पांकरिता मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी हौसिंग स्टॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली. महाराष्ट्रात तसेच मुंबईमध्ये वन, कांदळवन, सीआरझेड, इत्यादी ठिकाणी मूळ स्थितीत पुनर्विकास होऊ शकत नाही. तसेच बऱ्याचशा पायाभूत प्रकल्प जसे की रस्ता रुंदीकरण, मेट्रो, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प इत्यादींना जलदगतीने पुढे […]

Special Probe Ordered Into Maharashtra Water Projects Complaints
नागपूर महाराष्ट्र

जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची विशेष तपास पथकामार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली करण्यात आली असून २००८ ते २०१४ या कालावधीतील प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात विधानपरिषद सदस्यांच्या […]

Phaltan female doctor suicide investigation update
नागपूर महाराष्ट्र

फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण अधिवेशनात चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी दिली तपासाची सविस्तर माहिती…

नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात साताऱ्याच्या फलटण येथील तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा सभागृहात गाजला. विरोधकांच्या प्रश्नांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील तपासाची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, “फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आम्ही SIT ने तपास सुरू केला आहे. न्यायालयीन चौकशीदेखील सुरु असून, फॉरेन्सिक अहवालानुसार, तिच्या हातावर लिहिलेली नोंद तिचे […]