राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा २५ वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील वर्धापन दिनाच्या […]
टॅग: जयंत पाटील
मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी […]
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही – जयंत पाटील
मुंबई : सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.’ असं ते म्हणाले. जयंत पाटील यांनी ट्वीट केलं कि, […]
बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय
बीड : बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल . जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदामंत्री पाटील म्हणाले जल सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण […]
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले…
सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते ९४ वर्षाचे होते. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि रात्री ९ च्या सुमारास त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून […]
मराठवाड्यातील पाणीटंचाई असणाऱ्या भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा- जयंत पाटील
मुंबई : मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण […]
महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चेला उधाण, ‘त्या’ मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले…
मुंबई : जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे उद्गारही त्यांनी काढले. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, आज याबाबत शिवेसना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते […]
एकनाथ खडसे सीडी लावण्याच्या तयारीत.. गौप्यस्फोटाचे दिले संकेत
जळगाव : जामनेर येथे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात खडसे यांनी सीडी लावण्याचा इशारा दिला आहे. ‘तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन’, असे मागे मी गमतीने बोललो होतो. मात्र, खरोखरच त्यांनी माझ्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आता मला सीडी लावावीच लागेल. सीडी लावण्याचे काम आता बाकी आहे’, अशा शब्दांत […]
राजकारणात अनेक जयंत पाटील, राणे नेमकं कोणत्या पाटलांबद्दल बोलले – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात अनेक जयंत पाटील आहेत. राणे नेमकं कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही,’ अशा शब्दांत सुळे यांनी राणेंच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज महाविकास आघाडीचं सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते. जयंत पाटील […]
नारायण राणेंचा मोठा दावा : जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी झाली होती; गद्दारी करून सरकार स्थापन
रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं […]