Chhagan Bhujbal Returns to Maharashtra Cabinet
महाराष्ट्र मुंबई

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन, घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आले होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भुजबळ यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदासाठी भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. […]

नागपूर महाराष्ट्र राजकारण

ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा…, छगन भुजबळांनी जाहीर केली नाराजी

नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. […]

Maharashtra Cabinet Expansion: New Ministers Taking Oath in Nagpur, BJP, Shiv Sena Shinde Faction, and NCP Ajit Pawar Faction Representatives.
नागपूर महाराष्ट्र राजकारण

मंत्रिमंडळ विस्तार: नव्या मंत्र्यांचा शपथविधी, ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर ५ डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आणि नागपूरमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपच्या १९ मंत्र्यांनी, शिवसेना शिंदे गटाच्या ११ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीत […]

Chhagan Bhujbal
कोरोना महाराष्ट्र मुंबई

राजकारण्यांना कोरोनाचा विळखा! आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी स्वतः याबाबत माहित दिली आहे. भुजबळ म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी […]

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा

मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क […]

Girls school will be created by developing Bhidewada
पुणे महाराष्ट्र

भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार

पुणे : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्यप्रदेशचे आमदार […]

According to the Food Security Act, every eligible beneficiary should be identified and food grains should be delivered to them
बीड महाराष्ट्र

अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक गरजू पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहाेचावे

बीड : अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक गरजूला शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी आणि अशा पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांच्यापर्यांत अन्नधान्य पोहचावे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड जिल्हा […]

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र मुंबई

शहरी भागातील जनतेला मोठा दिलासा, शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करणार

मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची […]

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली दमानिया वरच्या कोर्टात दाद मागणार

मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. […]

Chhagan Bhujbal
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका

मुंबई : राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना […]