औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यामध्ये 5 हजार पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध नामांकित कंपन्यांमध्ये आयटीआय, दहावी ते पदवीधर तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी, पदविकाधारक उमेदवारांसाठी नोकरी, ऑन जॉब ट्रेनिंग तसेच अप्रेंटीशिपच्या […]
टॅग: औरंगाबाद
17 आणि 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा, स्टार्टअप प्रदर्शन, करिअर कौन्सिलिंगसह विविध उपक्रम
औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटीशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद विमानतळावर स्वागत
औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक दिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसमवेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उत्पादन शुल्क मंत्री […]
औरंगाबादमध्ये धावत्या बसला भीषण आग, चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे 28 जण सुखरूप
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक मोठा अपघात टळला. येथील गंगापूर तालुक्यात काल रात्री एका चालत्या एसटी बसला अचानक आग लागली. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटीच्या बस चालकाने परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली आणि बसमधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. घटनेच्या वेळी बसमध्ये 28 जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, ढोरेगाव येथील नाशिकहून हिंगोलीकडे जाणाऱ्या एसटी […]
औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास रु. 890.64 कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुमारे 65 गावामधील 20 हजार 265 हेक्टर […]
नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत
मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]
मोठी बातमी! औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेची मागणी
मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करावे, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा होईल, अशी माहिती महाराष्ट्र मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. औरंगाबाद […]
कारणे सांगत बसू नका, औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना…
औरंगाबाद : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. पाणी योजनेच्या कामात कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास […]
औरंगाबादमध्ये खळबळ! जन्मदात्याकडून मुलीवर तब्बल अकरा वर्षे बलात्कार, ४० वर्षीय नराधमाला अटक
औरंगाबाद : वडिलांनी स्वत:च्याच मुलीवर अकरा वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी अगदी लहान असताना सुरू झालेला अत्याचार इतके वर्ष सहन केल्यानंतर अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेतला. मात्र, चौकशीत तिने ११ वर्षे वडिलांनी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर […]
औरंगाबाद येथील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा, त्यांच्या मुलानेच केला धक्कादायक खुलासा…
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या देवेंद्र कलंत्री […]









