नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. ते ८९ वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी पहाडिया यांना कोरोनाची लागण झाली होती. गुडगावच्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

