जकार्ता : इंडोनेशियामध्ये बाली बेटाजवळ एक पाणबुडी बेपत्ता झाली आहे. इंडोनेशियन नौदलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या पाणबुडीत ५३ जण असल्याची माहिती समोर आली आहे. पाणबुडीचा ज्या ठिकाणावरून संपर्क तुटला त्या भागात तेलाचे तवंग पसरल्याचे एका हेलिकॉप्टरला दिसून आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ‘केआरआय नानग्गला ४०२’ बुधवारी एका प्रशिक्षण अभियानात सहभागी झाली होती. […]

