केंद्र सरकारने तातडीचा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं […]

