भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर रोहित शर्माच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रोहितने दुसऱ्या कसोटीत शतक ठोकत त्याला दमदार उत्तर दिले. रोहितने आक्रमक पवित्रा घेत सातवं कसोटी शतक पूर्ण केलं.
भारताने नाणेफेक जिंकल्यावर सलामीला शुबमन गिल आणि रोहित शर्मा आले. गिल शून्यावर माघारी परतला. पण रोहितने मात्र अर्धशतक लगावले. रोहितचे हे कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक ठरले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली दोघे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिली. रोहितने १३० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं.
?
Seventh Test hundred for Rohit Sharma – his first in Chennai ?#INDvENG | https://t.co/DSmqrU68EB pic.twitter.com/uvktWDMWHC
— ICC (@ICC) February 13, 2021
घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत. तर यादीत वेस्ट इंडिजचे जॉर्ज हेडली ७७.६च्या सरासरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.




