rbi
देश

ब्रेकिंग! शक्तीकांत दास यांची पुन्हा RBI चे गव्हर्नर म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती केली आहे. ही पुनर्नियुक्ती 10 डिसेंबर 2021 पासून लागू होईल किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी जे आधी असेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरुवारी रात्री उशिरा या निर्णयाला मंजुरी दिली. दास हे यापूर्वी अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव होते आणि त्यांची 11 डिसेंबर 2018 रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तिकांत दास यांना शासनाच्या विविध क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत