Siddheshwarnath temple stampede, 7 devotees killed
देश

सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, 7 भाविकांचा मृत्यू

बिहार : बिहारच्या जेहानाबादमध्ये श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ७ कावड धारकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते आणि दुसऱ्या बाजूने चढत होते. गोंधळ झाल्यावर बंदोबस्तात सहभागी असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. यामुळे चेंगराचेंगरी झाली, भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि चिरडले गेले.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जहानाबादच्या डीएम अलंकृता पांडे म्हणाल्या, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी सांगितले कि, अनेक लोक रुग्णालयात आहेत. प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केलेली नाही. प्रशासनाने योग्य व्यवस्था केली असती तर लोकांचे प्राण वाचू शकले असते. परंतु, येथे निष्काळजीपणा झाला आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ७ जणांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत