बिहार : बिहारच्या जेहानाबादमध्ये श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ७ कावड धारकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते […]

