Vacated 113 acres of land Jejuri devsthan - Gopichand Padalkar

सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत गोपीचंद पडळकर म्हणाले- ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने कब्जा मारलेली जमिन…

महाराष्ट्र

जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आभार मानले आहेत, तसेच त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका देखील केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सर्वाच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देत स्पष्ट केले आहे कि, मराठेकालीन आणि पेशवेकालीन राजे महाराज यांनी देवाच्या नावाने ज्या जमिनी मानकरी किंवा सेवेकरी यांना दिल्या होत्या, त्या जमिनी आता देवसंस्थानाच्या मालकीच्या असून वहिवाटदारांना त्यावर हक्क सांगता येणार नाही. याचा सर्वाधिक लाभ मार्तंड देवस्थानला झाला आहे. दरम्यान, यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबीयांवर निशाना साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी देवस्थान जमिनीसंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।।

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत