मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली आहे. राणे उद्यापासून त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार आहेत. मात्र त्यापूर्वी नारायण राणे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
२ दिवसांपूर्वी नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांचा रक्तदाब वाढला होता. याशिवाय त्यांना मधुमेहाचाही त्रास आहे. राणेंना दोन दिवसापूर्वीच त्रास जाणवत होता. त्यावेळी प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर औषधे घेतल्यानंतर राणेंचा त्रास कमी झाला होता. त्यामुळे उद्या जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरु करण्यापूर्वी चेकअप करून घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.




