संगमनेर : TV९ चे पत्रकार पांडुरंग रायकर आरोग्य विभागाच्या अनास्थेचा बळी ठरले. त्यांना न्याय मिळावा व त्यांच्या मृत्यूला कारनीभूत असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मा. सुधाकर मांडवकर यांना निवेदन दिले.
यावेळी दै. लोकसत्ता चे जेष्ठ पत्रकार सितारामजी चांडे, दै. पुण्यनगरी चे पत्रकार संजय गायकवाड, दै. लोकमत चे पत्रकार योगेशजी रातडीया, दै. सार्वमत चे पत्रकार रवीद्रं बालोटे, दै. राष्ट्र सह्याद्री चे पत्रकार अनिल शेळके, पत्रकार संकेत कचेरीया आदि उपस्थित होते.




