Fire breaks out in two wheeler service center on sinhagad road in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात टीव्हीएस बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग

पुणे : सिंहगड रोडवरील नवशा मारुतीजवळील दुचाकी सर्व्हिस सेंटरला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सर्व्हिस सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे 20 ते 25 गाड्या जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, टीव्हीएस बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये सकाळी 7:45 च्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. परंतु तोपर्यंत सर्व्हिस सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या सुमारे 20 ते 25 गाड्या जळून खाक झाल्या. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत