Vishvas-Nangare-patil

नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोडताना विश्वास नांगरे पाटील झाले भावुक

नाशिक महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारने पोलिस दलात फेरबदल करत 40 हून अधिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नांगरे पाटलांकडून पदभार स्वीकारला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नाशिक येथून पदमुक्त होऊन मुंबईकडे रवाना झाले. पदभार सोडताना नाशिकच्या जनतेसाठी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना नांगरे पाटील भावूक झाले.

विश्वास नांगरे पाटील यांचा मेसेज:

“नाशिककर नमस्कार, गेली दीड वर्ष आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली. आज मी पोलीस आयुक्तपदाचा चार्ज दीपक पांडे यांच्याकडे देऊन मुंबईला सहआयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी रवाना होत आहे. गेली दीड वर्ष या प्रगत, सुधारणावादी शहराची सेवा करण्याची संधी मिळाली. या शहराला पौराणिक, ऐतिहासिक असा ठेवा आहे. शिक्षण, शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्या क्षेत्रात नाशिकची घोडदौड मोठ्या वेगाने सुरु आहे. इथे काम करताना इथली माती, इथली माणसं, इथलं पाणी, इथला निसर्ग यांच्या प्रेमात माणूस पडतो. या आल्हाददायक, गोड शहराला सोडून जाताना निश्चित अंतःकरण जड आहे. पण हा ऋणानुबंध कायम राहील. आपल्या संपर्कात राहीन, आपले आशीर्वाद, प्रेम माझ्या पाठीशी राहील, अशी अपेक्षा करतो. कोव्हिड संक्रमण काळ असो, निवडणुका किंवा सण-उत्सव, नाशिककर माझ्या पाठीशी कायम उभे राहिले. नाशिकची जनताच प्रगल्भ आहे, कायद्याचे पालन करणारी आहे. नाशिकरांच्या प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी सदैव सुयश चिंतितो. जय हिंद!” -विश्वास नांगरे पाटील

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत