The body of a person
नागपूर महाराष्ट्र

हृदयद्रावक! मुलाला शाळेत सोडण्यासाठी जाताना घडला अनर्थ… वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

नागपूर : तिरोडा तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवर निघालेले वडील विजेच्या तडाख्यामुळे पडलेल्या झाडाखाली दबून जागीच ठार झाले, तर त्यांच्या पाठीमागे बसलेला मुलगा गंभीर जखमी झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ही घटना सातोना–बोपेसर मार्गावर घडली. मृत व्यक्तीचे नाव जीवचंद यादोराव बिसेन (वय 46) असे असून, गंभीर जखमी मुलाचे नाव चिराग जीवचंद बिसेन (वय 16) आहे.

सकाळपासूनच तिरोडा परिसरात पावसाने हजेरी लावली होती. जीवचंद बिसेन हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकी (क्र. MH 35 AP 9370)वरून तिरोडाकडे निघाले होते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या करंजीच्या झाडावर अचानक वीज पडली. विजेचा तडाखा बसल्याने झाड मोडून थेट रस्त्यावर कोसळले आणि दुर्दैवाने त्या क्षणी दुचाकी झाडाखाली आली.

काही कळण्याच्या आत झाडाच्या वजनाखाली दबून जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिराग गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मोठ्या प्रयत्नाने चिरागला झाडाखालून बाहेर काढले.

कोणतीही वेळ वाया न घालवता चिरागला तातडीने गोंदियातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बिसेन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत