Revenue Minister Chandrashekhar Bawankule learned about the problems of the people through public interaction
नागपूर महाराष्ट्र

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या, २८० निवेदने स्वीकारली

नागपूर : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आश्वस्त केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली.यावेळी २८० लेखी निवेदने स्वीकारण्यात आली.यावेळी नागरिकांनी व्यक्तिशः भेट घेवून संवाद साधत आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्या लेखी स्वरुपात सादर केल्या.

विविध शिष्टमंडळांनीही यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदने सादर केली. जनतेच्या समस्या, मागण्या समजून घेत यावर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देशही दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत