नागपूर जिल्हयात नवेगाव खैरी प्रकल्पातून सरासरी ६८३९ क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून ६६९३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून एकूण २५ गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे २ हजार ९०७ कुटुंबांतील ११ हजार ६४ व्यक्तींना फटका बसला आहे. अनेक नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले.
या सर्व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले, त्यामुळे याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर विभागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना १६ कोटी ५० लाख रुपयांची मदत वाटप करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये घरगुती सामान, कच्ची व पक्की घरे त्याचबरोबर मदत छावण्या यासाठीच्या अर्थसहाय्याचा देखील समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नागपूर विभागात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या व्यक्तींना १६ कोटी ५० लाख रुपयांची मदत वाटप करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये घरगुती सामान, कच्ची व पक्की घरे, मदत छावण्या यासाठीच्या अर्थसहाय्याचा समावेश आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 4, 2020




