मुंबई : ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळत असल्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. काल मुंबईत ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत, तर पिंपरी चिचंवडमध्ये 4 रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे.
मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सतर्कता म्हणून मोर्चे, आंदोलन आणि रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे.




