Minister Dadaji Bhuse inspected the work of 'Bandra-Versova Sea Route'
महाराष्ट्र

‘वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गा’च्या कामाची मंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी

मुंबई : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी वांद्रे- वर्सोवा सागरी मार्गाच्या कामाची पाहणी वांद्रे येथे केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता सुनील भुतडा, कार्यकारी अभियंता नितीन बोरोले व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याप्रसंगी मंत्री भुसे यांनी वांद्रे – वर्सोवा सागरी महामार्ग, जुहू जोडणी रस्ता, वर्सोवा जोडणी रस्ता, वांद्रे येथील जेट्टी बांधकामाची माहिती घेत सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामाचे टप्पे करून प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, त्यानुसार कामाचे नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत