Martyr Jawan Nilesh Dhande's last rites at Warur Jaulka
महाराष्ट्र

शहीद जवान निलेश धांडे यांच्या पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अकोला : वरुर जऊळका ता. अकोट येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीर जवानास अखेरचा निरोप दिला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शहीद निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर या पदावर सन 2013 पासून कार्यरत होते. नागालँड येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि. 4) विशेष विमानाने नागालँड येथून नागपूर व नागपूर येथून विशेष वाहनाने मुळगावी आणण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत