Maharashtra Budget 2022 Govt Cut Tax On Natural Gas By 10 Percent
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र बजेट 2022 : सीएनजी, पाईप गॅस होणार स्वस्त, पण पेट्रोल -डिझेल मात्र…

मुंबई : राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली आहे. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून कमी करून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र मूल्यवर्धित कर तसेच ठेवल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षा मात्र मावळल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महाविकास आघाडी सरकारने आज तिसरा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. यात अर्थमंत्री अजित पवार यांनी नैसर्गिक वायूवरील कर ३.५ टक्के इतका केला आहे, त्यामुळे लवकरच गॅस वितरक कंपन्यांकडून दर कपात होण्याची शक्यता आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धीत करात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल चढ्या दराने खरेदी करावे लागणार आहे. दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी देखील शुल्क कपात केली. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील व्हॅटचा दर तसाच ठेवला होता.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली होती. मुंबई आणि पुणे सारख्या महानगरात सीएनजीचा दर ६३ ते ६६ रुपयांच्या दरम्यान आहे. घरगुती वापराचा पाईप गॅस आता ३६ ते ३८ रुपये किलो आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत