केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने शुक्रवारी 10वी, 12वी टर्म-II परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. CBSE ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म-2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून होणार आहेत. यावेळी परीक्षेची वेळ सकाळी साडेदहा वाजता असेल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. तसेच ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेची घोषणा केली आहे. ही बोर्ड परीक्षा २६ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. विविध भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि देशातील कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
26 एप्रिलपासून परीक्षा होणार आहेत
टर्म-2 परीक्षा फक्त ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली. 26 एप्रिल 2022 पासून लेखी परीक्षा सुरू होणार आहेत. त्याच बरोबर 10वीचे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#CBSE #CBSEexams #CBSEexamSchedule #Students
Schedule for Term II exams Class X 2022
Details also available at https://t.co/xA4WhyG5VW pic.twitter.com/oZKDIG8r0R— CBSE HQ (@cbseindia29) March 11, 2022




