गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे.
इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळी उभारण्यात येणाऱ्या भव्य पुतळ्याची प्रतिकृती प्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांच्या टीमने तयार केली आहे. आज राज्य शासनाच्या समितीच्या वतीने या प्रतिकृतीची गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे जाऊन पाहणी केली. या 25 फुटी प्रतिकृती मध्ये एम.एम.आर.डी.ए. ने व आम्ही सुचवलेले आवश्यक बदल पूर्ण करून प्रतिकृतीस अंतिम मान्यता घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी दिल्या. त्या वेळी समाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे यांसह विभागाचे अधिकारी व मान्यवर या दौऱ्यात उपस्थित होते.
या 25 फुटी प्रतिकृती मध्ये एम.एम.आर.डी.ए. ने व आम्ही सुचवलेले आवश्यक बदल पूर्ण करून प्रतिकृतीस अंतिम मान्यता घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना यावेळी दिल्या. शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad ताई यांसह विभागाचे अधिकारी व मान्यवर या दौऱ्यात उपस्थित होते. pic.twitter.com/mdHgrjK4R0
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 19, 2022




