मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. ते नेमके काय बोलतात याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. परंतु, ते कोरोनाचा विळखा, निर्बंधात शिथिलता, राज्यात सुरू असलेले अनलॉक या पार्श्वभूमीवर काय बोलतात? हे महत्वाचे ठरणार आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray | Address to the State | 8th August 2021 https://t.co/48Ot07NU1G
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2021
- मुंबईत पॉझिटिव्हिटी रेट 1 पेक्षाही खाली आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
- राज्यातील दुकानांच्या वेळा संचारबंदी आणि इतर निर्बंधांबाबतही निर्णयाची शक्यता आहे.
- बार अँन्ड रेस्टॉरंट यांची वेळ वाढवून देण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.
- राज्यातील व्यापारी संघटनेने व्यापार, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल काय निर्णय घेतील, याकडेही व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.
- तिसऱ्या टप्यातील नियमांप्रमाणे संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश लागू आहेत. त्यावर काय निर्णय होणार?
- काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा.
- रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल.




