मुंबई : राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, नाशिक, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आज पुन्हा हाय अलर्ट असू शकतो.
Intense spells of rain very likely to occur in the districs of Ratnagiri, Nasik, Beed,Parbhani, Latur, Nanded & Osmanabad during next 3-4 hrs.Moderate to intense spells very likely over Dhule,Nandurbar,Jalgaon, Aurangabad & Solapur. Possibility of thunder/lightning in some areas pic.twitter.com/CMVW69AAi3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 7, 2021
येत्या २-3 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक प्रभाव राहणार असून कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. आज पुणे, ठाणे, रायगड, पालघर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड ह्या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पुन्हा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
7Sept, 1.15pm latest satellite obs indicate mod to intense dense clouds over N Madhya Maharashtra, S Konkan & parts of Marathwada.
Mumbai Thane mod clouds with so far no rains since morning.
Konkan could be on high alert today again. Watch for IMD warnings pl.
Stay home Stay safe pic.twitter.com/ePQSzKpXra— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021




